उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उमरगा तालुक्यातील जवळगा (बेट) येथील सरपंचांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

निवेदनात म्हटले आहे की, सरपंचांनी निवड झाल्यानंतर ४५ दिवसात ग्रामविकास समिती, ग्रामपंचायत उपसमितीची स्थापना केली नाही. मासिक बैठकीत सूचना करून देखील मत प्रोसिडिंगला घेतले नाही. उमरगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य उषा गायकवाड, बालाजी शिंगे, आर. एस. गायकवाड, मिलिंद रोकडे, विकास बनसोडे, कुंदन वाघमारे, यशपाल गायकवाड, मारुती बनसोडे, बाबुराव गायकवाड आदी उपोषणाला बसले आहेत.


 
Top