तेर/प्रतिनिधी

 वयोवृद्ध महिलेला मंदिराजवळ सोडून दोन युवकांनी  पोबारा केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 18 मार्चला सायंकाळी घडली.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिराच्या पूर्वैकडील दरवाज्याकडे दोन युवकानी 90 वर्षीय महिलेला मोटारसायकलवर मध्यभागी बसवून 18 मार्चला रात्री दहाच्या दरम्यान आणले होते.परंतू त्याठिकाणी कांहीं युवक व दुकानदार असल्याने युवकांनी मोटार सायकल वळवून मंदिराच्या दक्षिण बाजूकडील दरवाज्याजवळ वयोवृद्ध महिलेला सोडले व त्या दोन युवकांनी मोटारसायकलवरून पोबारा केला.नंतर वयोवृद्ध महिला मंदिराच्या दरवाज्याजवळ हळूहळू सरकत सरकत आली.वयोवृद्ध महीलेला नाव,गाव याबाबत माहिती विचारली असता महीलेला माहीती  सांगता येत नाही.कोणाला याबाबत माहिती मिळाल्यास कळवावे असे आवाहन मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.

 
Top