मुरुम (प्रतिनिधी) : 

मुरूमचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्ल मुरूम शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरात शनिवारी (ता. १९)  रोजी रात्री जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. शहरात दुपारी चार वाजल्यापासूनच मेन रोडवर डागा हॉस्पिटल ते अशोक चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस परिसरातील विविध गावांमधून आलेले हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करण्याकरिता उपस्थित होते. यावेळी परिसरातील सर्व काँग्रेसप्रेमी युवकांनी छ्त्रपती शिवाजी चौकात शरण पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांच्या अतिषबाजीसह गुलाल, पुष्पवृष्टी, घोषणाबाजी करत ढोल-ताशाच्या गजरात त्यांचे क्रेनच्या साह्याने तीन टन वजनाचा, विविध रंगात बनविलेला भव्य पुष्पहार घालून शरण पाटील यांना शाल व फेटा बांधून पुष्पवृष्टी करून यथोचित सत्कार विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. पारंपारिक वाद्यावर विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरा-तालात ठेका धरून मनसोक्त डान्स करत आपल्या नेत्याचे भव्यदिव्य असे स्वागत करून शहरातून जंगी मिरवणूक काढली. सदर मिरवणुक पाहण्याकरिता  शहरातील नागरिक मोठया संख्येने हजेरी लावून होते. यावेळी युवकवर्ग या मिरवणूकीत आकर्षित होऊन सहभागी झाले. तर ज्येष्ठ मंडळी या मिरवणूकीचे तोंडभरून कौतुक करत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, सरपंच योगेश राठोड, प्रदेश सरचिटणीस महालिंगआप्पा बाबशेट्टी, गौस शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, बबनराव बनसोडे, उल्हास घुरघुरे, राहूल वाघ, श्रीकांत बेंडकाळे, राजू मुल्ला, गणेश अंबर, किरण गायकवाड, झुंबर बनसोडे, प्रशांत मुरुमकर, गौरीशंकर बोंगरगे, देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, ओमकार पाटील, दिगंबर सोनटक्के, धनराज शिंदे, महावीर नारायणकर, सुरज राजपूत, आयुब चाऊस, सुभाष दुर्गे, नाना बेंडकाळे, बाळासाहेब गिरीबा, गोविंद कौलकर, गोविंद बेळंबकर, संजू पोतदार, सुरज कांबळे आदींच्या पुढाकाराने ही मिरवणूक यशस्वी करण्यात आली.


 
Top