उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांना ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात साथ िदली. शाहु महाराजांनी आठरापकड जातीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले.त्याचेच वारस असलेले छत्रपती संभाजी महाराजांनी ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी अॅड. खंडेराव चौरे व पिराजी मंजुळे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दाखल केलेले ओबीसी आरक्षण प्रस्ताव अनेक चुका असल्याचे कारण देऊन फेटाळल्यानंतर शुक्रवार दि.४ मार्च रोजी ओबीसी  जनमोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अॅड. चौरे व मंजुळे बोलत होते. ओबीसी जनर्मोचाचे जिल्हाप्रमुख सचिन शेंडगे, इंद्रजित देवकते, शशिकांत राठोड आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्य सरकार व केंद्र सरकार हे ओबीसी समाजाच्या विरोधातले सरकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण फेटाळल्यानंतर ही ओबीसी मंत्री मंत्रीमंडळात आहेत. ओबीसींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सर्वच पक्ष करीत आहेत.परंतू समाज शांत न बसता पेटून उठेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

राज्यसरकारची चुक 

राज्य सरकार ने जो डाटा सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्या अनेक चुका आहेत. त्याच्यावर अधिकृत कोणाचाही सही देखील नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात डाटा दाखल करण्याचे नाटक केले. या विरोधात सर्व ओबीसी समाजात जागृती करून येत्या ९ मार्चला निषेधार्थांत लाक्षणीक उपोषण करणार असल्याचे सांगितले. खुल्या प्रवर्गातून ओबीसी समाजातील लोकांनी निवडणुक लडविल्यास जाती-जातीत तेढ निर्माण होईल आणि हे तेढ निर्माण करण्यासाठी हे षढयंत्र असल्याची टिका देवकते, चौरे, मंजुळे, शेडगे यांनी केले. 

 
Top