उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जिल्हयात सध्याच्या काळात   ऊसाचे पीक मोठया प्रमाणात झाल्याने आतिरिक्त  ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे| जिल्हयातील कारखान्याचे तीन -तीन महिने उशीराने कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा ऊस अदयापही फडातच आहे. त्यामुळे ऊसाचे संपूर्ण गाळप झाल्याशिवाय जिल्हयातील साखर कारखान्यानी चालू गळीत हंगाम बंद करु नये अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आज बुधवारी (दि.23)रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे 

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी जिल्हयात ऊसाचे क्षेत्र  वाढले आहे.त्यातच कारखान्यांनी कार्यक्रम उशीरा सुरु केले त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस अदयाप फडातच उभा आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे  त्यातच लेबर एकरी दहा ते पंधरा हजार तर ड्रायव्हरला प्रत्येक खेपेला पैसे दयावे लागत आहेत,ज्या शेतकऱ्याचा ऊस जाऊन महिना दोन महिने झालेत त्यांना ही  अदयाप ऊसाचे बिल मिळाले नाही .त्यातच महावितरण कडुन विजेचा लपंडाव ,डीपी जळाला तर लवकर मिळत नाही अशा अनेक अडचणीमुळे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली असुन त्यामुळे ऊस घालवताना शेतकऱ्याच्या  डोळयाला पाणी येताना दिसून येत आहे  शेतकऱ्याच्या ऊसाची दुरावस्था संपवुन  शेतक-यांचा शिल्लक ऊस तातडीने नेण्यासाठी  आपल्या स्तरावरून तशा सुचना संबधित यंञणेशी देऊन  शेतकऱ्याना दिलासा दयावा तसेच ऊसतोडणीचा कालावधी संपुन गेलेल्या ऊसाला सरासरी प्रति टन 300 रुपये अनुदान द्यावे.अशी मागणीही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर भाजपा किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, भाजपा किसान मोर्चा तालुका प्रमुख तथा पं.स.माजी सभापती नानासाहेब कदम, विष्णू माने, नंदकुमार माळी,विक्रम शेख, इंद्रजित मनसुके, लिंबराज ऐैतनबुने यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top