उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगर परिषद उस्मानाबाद मधील जगदिशराजे निंबाळकर यांच्यासह १० कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्यापासून थकबाकी रक्कम दोन कोटी २५ लाख रुपये देण्याचे आदेश कामगार न्यायालय लातूर यांनी दिले आहेत, अशी माहिती अॅड. दिलीप मराठे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद नगर पालिकेतील ११ कर्मचाऱ्यांना १ जुलै २०९६ व १ जुलै २००० पासून सेवेत कायम करण्यात आले होते. परंतू त्यांना थकबाकी रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नव्हती त्यामुळे या ११ कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालय लातूर येथे अॅड. मराठे यांच्या मार्फत थकबाकी वसूलीसाठी प्रकरण दाखल केले होते. या ११ प्रकरणामध्ये लातूर येथील कामगार न्यायालयाच्या न्यायाधिश मधुरा मुळीक यांनी १६ मार्च २०२२ रोजी निकाल देऊन या ११ कर्मचाऱ्यांचे मागील थकबाकी पोटी एकुण रक्कम २ कोटी २५ लाख रुपये देण्याचे मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांना दिले आहेत. 

 
Top