परंडा / प्रतिनिधी : 

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालयास नुकतेच डिस्ट्रिक्ट ग्रीन चंपियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.भारत सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद उच्च शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे .

भारत सरकारच्या स्वच्छता, एक्शन प्लान, शानिटायजेशन ,वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट ,एनर्जी मॅनेजमेंट व ग्रीनरी मॅनेजमेंट या विविध महाविद्यालयाने आयोजित केलेल्या उपक्रमामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील या महाविद्यालयास सन्मानित करण्यात आले.श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमामुळे या महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे विविध उपक्रम राबविले जातात.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयास नॅक समितीचा अ दर्जा प्राप्त झाला असून त्यांनी शैक्षणिक उपक्रमात बरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून केले आहे.संस्थेने स्वतःच्या फंडातून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सी एन बी बंधारा बांधून जलसंवर्धन केले.त्यामुळे महाविद्यालयात लागणाऱ्या पाण्याची गरज त्या बंधाऱ्यामुळे पूर्ण झाली आहे.  महाविद्यालयामध्ये वस्तीग्रह, सोलर वॉटर हीटर चा वापर ,तीन  के व्ही सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प ,वृक्ष लागवड व संवर्धन, कोवीड काळामध्ये सामाजिक उपक्रम अशा विविध अंगाने केलेल्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने सदर पुरस्कार दिला आहे.या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते होणार आहे.


 
Top