उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील आकुबाई पाडोळी जिल्हा परिषद मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहतीचे घरकुले बांधून आज लोकार्पण करण्यात आले. राज्यातील आकुबाई पाडोळी जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वाधिक यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल बांधण्याचा विक्रम केला आहे  आणि आज अतिशय उत्तम पद्धतीचे घरकुल बांधून तयार आहे .

जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर यांच्या प्रचंड इच्छाशक्ती तून मेहनतीतून व प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे आज 104 घरकुलांचा लोकार्पण सोहळा मतदारसंघांमध्ये संपन्न झाला .

यावेळी सरपंच, उपसरपंच विस्ताराधिकारी भांगे साहेब,DrD अधिकारी पवार मेघराज ,ग्रामसेवक गुरव ,सोकांडे व नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी सांगितले की मतदारसंघांमध्ये ज्यावेळी मी प्रथम फेरी  मतदारसंघाचे केली .त्यावेळी लोकांची मागणी होती की आम्ही पालामध्ये/ झोपड्यांमध्ये राहतो, तर आम्हाला फक्त घर द्यावे.  त्यावेळी जिल्हा सदस्यांनी कु. सक्षणा सलगर शब्द दिला होता की पाच वर्षांमध्ये तुम्हाला घरकुल बांधून मिळतील आणि तो हा शब्द पूर्ण करताना आम्हाला समाधान व आनंद वाटत आहे.

नागरिकांनी देखील अतिशय आनंद व्यक्त केला आहे .समाधान व्यक्त केला आहे.


 
Top