तुळजापूर / प्रतिनिधी-  

शाळेच्या विद्यार्थांच्या  कोणत्याही  समस्या असतील त्या सोडविण्यास आम्ही  कटीबध्दी असल्याचे स्पष्टकरुन नवोदय विद्यालयाच्या  विकासासाठी आम्ही सदैव तयार आहोत, असे प्रतिपादन जवाहर नवोदय विद्यालयात  झालेल्या शालेय व्यवस्थापन व खाद्य सामग्री बैठकीत  जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले. 

  यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे ,वैद्यकीय अधिकारी आर. टी .वाघमारे , तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य   एन. डी पेरगाड,  लोकप्रतिनिधी सदस्य  आप्पासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती  मनीषा मेने मॅडम, शिक्षण विभाग प्रतिनिधी बी.के. येरमुनवाड,उप अभियंता आर .एच .खंडागळे, अन्य  प्रतिनिधींच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली. 

दरम्यान विद्यालयाचे उपप्राचार्य  एस . व्ही. स्वामी यांनी शाळेतील वेगवेगळ्या उपक्रम, विकासाविषयी सविस्तर माहिती सांगितली. शाळेचा परिसर ,शाळेचा विकास, भोजनालय, निवास व्यवस्था शाळेचे वेगळे उपक्रम पाहून निवासी उपजिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी यांनी प्राचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले . याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व फेटा बांधून  सत्कार केला. यावेळी  विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन  एस .जी. भोरगे यांनी केले. विद्यालयाचे संगीत अध्यापक पी. एन. जोशी यांनी आपल्या स्वागत गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.


 
Top