तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील सार्वजनिक बांधकाम ,उपविभाग तुळजापूर येथील चौकीदार या पदावरून श्रीमती यशोदा नागनाथ नरवडे सेवानिवृत्त झाल्यानंतर   यांचा  सन्मान  करुन निरोप देण्यात  आला.

 यावेळी सत्कारमूर्ती निवृत्त श्रीमती यशोदा नागनाथ नरवडे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डेपोटी इंजिनियर खंडागळे,हेड क्लार्क घाडगे ,चंद्रवदन शेटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,हेड क्लार्क घाडगे यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रवदन शेटे यांनी केले तर आभार बालाजी नखडे यांनी केले. यावेळी अधिकारी- कर्मचारी , पत्रकार आदि उपस्थित होते.

 
Top