उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठी भाषा ही साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहचली आहे.  याचा सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे वैभव संत महात्मे व साहित्यिक यांनी जसे वाढविले आहे.  त्याचं जतन करणे आपले कर्तव्य आहे,असे उद्गार राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण  यांनी  अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.

 कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा मराठी विभाग व अक्षरवेल माहिला साहित्य मंडळ नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिना निमित्त संत साहित्याचा दरवळ व अभंग वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री  मधुकरराव चव्हाण हे होते तर  प्रमुख पाहुणे व्याख्याते  प्रवचनकार  सुधाकर उपासे लेखक,कवी, डॉ .संपदा खोमणे पाटील,  शहबाज काझी, सौ . सुभद्रा मुळे, प्राचार्य डॉ.संजय कोरेकर, उपप्राचार्य रामदास ढोकळे, डॉ. दयानंद भोवाळ, मराठी विभाग प्रमुख, डॉ. लक्ष्मण थिट्टे, महिला साहित्य मंडळ च्या संस्थापिका कविता पुदाले, अध्यक्ष डॉ. जयश्री घोडके, उपाध्यक्षा सौ. राधिका मिटकरी ,अक्षरवेलच्या आजी माजी अध्यअध्यक्षा व उपाध्यक्षा सौ .मिनाक्षी काळे, सौ. मिलन कासार, श्रीम. कविता पुदाले, सौ रेखा क्हाडे, सौ.चंचला मोहरीर, तसेच सौ .शोभा ठाकूर  माऊली भजनी मंडळ, सौ घोडके खुदावाडी भजनी मंडळ,सौ. मिनाक्षी काळे नवदुर्गा भजनी मंडळ व सौ . सुभद्रा मुळे .ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. लक्ष्मण थिट्टे यांचा सत्कार मधुकरराव चव्हाणयांच्या  हस्ते करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . जयश्री घोडके यांनी  प्रास्ताविक केले. अध्यक्षीय भाषणात मधुकरराव चव्हाण  यांनी मातृभाषेचे जतन, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. असे सांगितले.  यावेळी शहबाजजी काझी, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, सौ. सुभद्रा मुळे,यांनी मनोगत व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे अध्यक्ष  मधुकर हुजरे , कवी  डॉ.अरविंद हंगरगेकर यांची  होती.कविसंमेलनातील मान्यवरांचे स्वागत व  डॉ संतोष पवार सुत्रसंचालक व विदयार्थी वेशभुषा प्रमुख डॉ. सचिन देवव्दारे यांचा सत्कार साहित्यिक सुधाकर उपासे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी श्रीम. कविता पुदाले, सौ. रेखा वऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केली अभंग वाचन व काव्य वाचनाने कवी संमेलन रंगले या कविसंमेलनात  कवी मधुकर हुजरे, डॉ. अरविंद हंगरगेकर , अनुराधा उपासे, कविता पुदाले, प्रा. एस पी कठारे, प्रा. बाळासाहेब दराडे, प्रा. खंडेराव काळे, कु. प्रियंका कांबळे, श्रुती जाधव, ऋतिका  सोमवंशी यांनी कविता सादर केल्या.   या  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी तर आभार डॉ. लक्ष्मण थिट्टे यांनी मानले.

 
Top