परांडा / प्रतिनिधी :- 

समाजामधील अंधश्रद्धा या केवळ विज्ञानामुळे नष्ट झाले आहेत असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना त्यांनी केले.

    महाविद्यालयांमध्ये विवेक वाहिनी आणि सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला .व्यासपीठावर  प्राचार्या डॉ दीपा सावळे ,प्रमुख पाहुणे म्हणून आयक्यू एसी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण ,विवेक वाहिनीचे चेअरमन डॉ विद्याधर नलवडे, सायन्स फोरम चे चेअरमन प्रा अमर गोरेपाटील आदी उपस्थित होते .यावेळी सायन्स फोरम आणि विवेक वाहिनी संदर्भात प्रा अमर गोरेपाटील आणि डॉ  विद्याधर नलवडे यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या .प्रमुख पाहुणे डॉ महेशकुमार  माने यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की शिक्षणाचा मुख्य उद्देश हा संशोधन असून केवळ विज्ञानामुळे संशोधन शक्य झाले आणि या महाविद्यालयांमध्ये संशोधनामध्ये प्राध्यापका बरोबरच विद्यार्थ्यांनीही बाजी मारली आहे .अध्यक्षीय समारोप करताना पुढे प्राचार्या डॉ  दीपा सावळे  म्हणाल्या की विविध यंत्र तंत्रज्ञान हे विज्ञानामुळे शक्य झाले आहे आहे.परंतु आजही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागातही अंधश्रद्धा दिसून येते त्याचे मुख्य कारण म्हणजे गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा अभाव तेव्हा सर्वांनी गुणवत्तापूर्वक शिक्षण घ्यावे, आपल्या घरातील ,समाजातील, नातेवाईकांना वास्तव सांगून विज्ञानाचे महत्त्व सांगून, अंधश्रद्धेला नष्ट करून भारताला महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करावे .

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा अमर गोरेपाटील यांनी केले तर आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top