उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेच्या, सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे,से.नि.उपप्राचार्य,प्रा.उत्तमराव हुंडेकर याना सोलापूर विद्यापीठातील अर्थशास्त्राचे ख्यातनाम संशोधक,स्व.प्रा.डॉ.चंद्रकांत भानुमते यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या परिवाराकडून दिला जाणारा “जीवन गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे.

 अर्थशास्त्र विषयातील लेखन,संशोधन विद्यापीठ,महाविद्यालय स्तरावरील कार्य व अर्थशास्त्र परिषदेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.प्रा.हुंडेकर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या,विविध महाविद्यालयातून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ३८ वर्ष सेवा केली. अर्थशास्त्र व सामाजिक विषयावर ग्रंथलेखन, आर्थिक व सामाजिक प्रश्नावर विविध नियतकालिके व वर्तमानपत्रातून, लेखन,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पत्रिकेत शोध निबंध प्रकाशन व सादरीकरण,या शिवाय, पुणे,शिवाजी व सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यासमंडळ, विद्वत परिषद,संशोधन समिती इ.प्राधिकारणावर मोलाचे योगदान दिलेले आहे.शिवाजी व सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेत कार्यकारिणी सदस्य व अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, स्व.एन. डी. पाटील यांच्या हस्ते २००३ मध्ये, “आदर्श रयत सेवक” पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.सेवा निवृत्तीनंतर ही,ते अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्यात कार्यरत आहेत. आजवरच्या त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, त्यांना रविवार दि.०६ मार्च रोजी सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या माढा महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या १६ व्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार 

देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रा. हुंडेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मा.डॉ.मृणालिनी फडणवीस व रयत शिक्षण संस्थेचे,चेअरमन,डॉ.अनिल पाटील यांनी फोन द्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

 
Top