तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरणालगतच्या ऊसाच्या पिकात 46 वार्षिक व्यक्तिचा मृतदेह आढळला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेणा धरणाच्या लगतच्या ऊसाच्या पिकात संजय नामदेव गायकवाड रा.शंकरनगर, परभणी वय 46 यांचा मृतदेह 26 मार्चच्या रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मारून टाकले.ही बाब गोवर्दनवाडीचे पोलिस पाटील महेश घाडगे यांना 27 मार्चला दुपारी 12 च्या दरम्यान दिसून आली .व त्यांच्या फिर्यादी वरुन ढोकी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.28 मार्चला तेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व तेर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सपोनि जगदीश राऊत करीत आहेत.

 
Top