तेर /  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री. संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रा  सोहळयासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रा सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गणेश माळी बोलत होते. यावेळी मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर ,तेरचे तलाठी प्रशांत देशमुख ,ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश राऊत ,तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनंदा मगरे ,जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्राची माळी, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर ,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, पोलीस पाटील फातीमा मणियार,श्री. संत गोरोबा काका व कालेश्वर मंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी भोसले, व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी भारत नाईकवाडी, जुनेद मोमीन ,संतोष बडवे ,अभिजीत सराफ ,अजित बडवे, विजय खांडेकर ,रतन नाईकवाडी, विठ्ठल कोकरे, केशव वाघमारे, श्रीमंत फंड ,काकासाहेब मगर ,पुरुषोत्तम पुजारी, सुधाकर बुकन,अमोल थोडसरे, तानाजी पिंपळे, गणेश फंड,इर्शाद मुलानी, इंद्रजीत कोळपे ,शीतल जाधव ,संगीता डोलारे, वंदना चव्हाण, दैवशाला भोरे ,मजीत मणियार, हरी खोटे, सुभाष कुलकर्णी आदी उपस्थित होते.


 
Top