उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापुर तालुक्यातील कदमवाडी येथील वारकऱ्यांचा अपघात झाला.त्यात जागेवरच चार वारकरी मृत्यु पावले.तर दोन जणावर उपचार सूरु असताना मयत झाले होते.जखमी झालेल्या वारकऱ्यांना व मयत झालेल्या वारकऱ्यांच्या नातलगाना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यानी घडलेली घटना व त्याचे गांभीर्य दाखवुन दिले. मुख्यमंत्री ठाकरे यानी कसलाही विलंब न लावता तातडीने मदत करण्याचा शब्द दिला होता,आजअखेर त्यानी शब्द पाळत ही मदत मयताच्या नातेवाईकांना देऊ केली आहे. मयताच्या कुटुंबियाना प्रत्येकी दोन लाख रुपयाची मदत देऊ केली असुन यामध्ये पहिल्या चार जणाचा मृत्यु झाला होता त्याना प्रथम मदत मिळाली आहे. उपचारादरम्यान दोन मयत झालेल्या कुटुंबियाना व जखमी वारकऱ्यांनाही लवकर मदत मिळणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यानी दिली आहे.

कदमवाडी (ता.तुळजापुर)येथील वारकरी हे पंढरपुर येथे ट्रॅक्टरने प्रवास करुन दर्शनासाठी जात होते.वाटेत जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यु झाला.त्यामध्ये १९ वारकरी गंभीर जखमी झाले असुन त्यापैकी चार वारकरी हे अतिगंभीर होते,त्यांची परिस्थिती नाजूक होती.त्यातील दोन वारकरी उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले,जखमी असलेल्या वारकऱ्यांनाही उपचाराचा खर्च पेलवण्याची आर्थिक स्थिती नसल्याचे आमदार पाटील यानी मुख्यमंत्री याना सांगितले आहे, त्यामुळे अपघातात मयत झालेल्याबरोबरच जखमीनाही मदत होणार असल्याचे आमदार पाटील यानी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मयत झालेल्या वारकऱ्यांच्या नातलगांना तत्काळ आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.


 
Top