उमरगा  / प्रतिनिधी-

खुर्जा (दिल्ली)येथे २१ दिवसाचे  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्राचे वितरण व निरोप समारंभ संपन्न करण्यात आले.

 उस्मानाबाद जिल्हयातील कुंभार समाज बांधवांना आवाहन  केल्याप्रमाणे  अखिल भारतीय प्रजापती महासंघ दिल्ली व  महाराष्ट कुंभार समाज विकास संस्था व खादी ग्रामोद्दोग  यांच्या संयुक्त विद्दमाने   दत्ताजी डाळजकर  नागनागनाथ  कुंभार यांच्या प्रेरणेतुन  जिल्हयातील कुंभार समाज बांधवांना  आधुनिक पद्धतीचे व आकर्षक मातीपासून विविध प्रकारच्या दैनंदिन घरगुती वापराच्या मातीपासून वस्तू बनविण्याचे २१ दिवसाचे खुर्जा (दिल्ली) येथे प्रशिक्षण कालावधी मध्ये डाॅ.एच.एस.त्रिपाठी,विपीनकुमार, कोमल सिंग मॅडम यांचे बहूमोल असे मार्गदर्शन लाभले  जिल्हयातील १२ कुंभार समाज बांधवानी  प्रशिक्षणाचा पुरेपुर उपयोग करून घेतला व कला आत्मसात केली, त्यांना पुढील आयुष्यभर प्रशिक्षणाचा  फायदा होणार आहे .

 पुढील वाटचालीसाठी  दत्ताजी डाळजकर साहेब!(अध्यक्ष मातीकला सेल ),प्रजापती(कुंभकार) महासंघ मुंबईचे उपाध्यक्ष  नागनाथअण्णाजी कुंभार, व उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  महादेवराव खटावकर आदिंनी प्रशिक्षणार्थाचे अभिनंदन करुण शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 
Top