वाशी / प्रतिनिधी- 

तालुक्यातील पिंपळगाव कमळेश्वर येथे शिवसेनेच्या वाशी पंचायत समिती सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांच्या निधीतून पिंपळगाव येथे शेत रस्ता,विद्युतीकरण व पाणीपुरवठा या विविध विकास कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर,युवासेना माजी तालुका प्रमुख बाळासाहेब मांगले,माजी तालुकाप्रमुख दीपक जोगदंड,युवा सेना तालुका प्रमुख भूम निलेश चव्हाण,पिंपळगाव चे सरपंच शिंदे,उपसरपंच राजाभाऊ जोगदंड,प्रकाश पाटील,लाखनगाव चे सरपंच एकनाथ लाखे,माजी सरपंच बंटी लाखे,बंडू मुळे,राजा कोळी, कालिदास जोगदंड,सतीश गव्हाणे,राम रोटे,अशोक गव्हाणे, बाबुराव गव्हाणे,तानाजी कोकाटे, संतोष घुले,तुकाराम आहिरे,दत्ता रोटे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top