वाशी / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील पिंपळगाव कमळेश्वर येथे शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कबड्डी स्पर्धेचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 या कबड्डी स्पर्धेसाठी शिवसेनेचे उपनेते तथा माजी जलसंधारण मंत्री आमदार तानाजीराव सावंत  यांच्या कडून या कबड्डी स्पर्धेसाठी अकरा हजार रुपये बक्षीस देण्यात आले आहे.युवा उद्योजक अजित टकले यांच्याकडून सात हजार रुपये द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आला आहे,तृतीय पारितोषिक आकाश संदिपान जोगदंड यांच्याकडून पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहे,चतुर्थ पारितोषिक वैभव जोगदंड यांच्याकडून तीन हजार रुपये ठेवण्यात आले आहे व पाचवे पारितोषिक दोन हजार रुपये अमित जोगदंड यांच्याकडून ठेवण्यात आले आहे,या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. य

ावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर,युवासेना माजी तालुका प्रमुख बाळासाहेब मांगले,माजी तालुकाप्रमुख दीपक जोगदंड,युवा सेना तालुका प्रमुख भूम निलेश चव्हाण,पिंपळगाव चे सरपंच शिंदे,उपसरपंच राजाभाऊ जोगदंड,प्रकाश पाटील,लाखनगाव चे सरपंच एकनाथ लाखे,माजी सरपंच बंटी लाखे,बंडू मुळे,राजा कोळी, कालिदास जोगदंड,सतीश गव्हाणे,राम रोटे,अशोक गव्हाणे, बाबुराव गव्हाणे,तानाजी कोकाटे, संतोष घुले,तुकाराम आहिरे,दत्ता रोटे,दत्ता जाधव,कृष्णा जोगदंड  कबड्डी स्पर्धेचे सर्व आयोजक आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 
Top