उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद  शहातील नाईकवाडी नगरातील नटराज नृत्य प्रशिक्षण केंद्र येथे नृत्य परिषद महाराष्ट्र पुणे सलग्न जिल्हा शाखा उस्मानाबाद जिल्हा नृत्य परिषद दि.१२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित बैठकीत उस्मानाबाद जिल्हा पालकपदी श्रीपतराव भोसले हायस्कुलचे कलाध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ यांची राज्यध्यक्ष मेघराज राजेभोसले व राज्य पदाधिकारी यांचे सुचनेनुसार मराठवाडा विभाग प्रमुख मयुर राजापुरे विभाग सचिव विशाल टोले यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व जिल्हा सचिव पदी जगदाळे विद्यालय वाशी येथे कार्यरत सहशिक्षक शीतल जगन्नाथ देशमुख यांना नृत्य परिषद जिल्हाध्यक्षा संगीता पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 याप्रसंगी नृत्यपरिषद शहर , तालुका , जिल्हा पदाधिकारी ओंकार झोरे,रेयांश झेंडे, किशोर कसबे, श्रद्धा बंडगर, शुभम खांडके, ऐश्वर्या शिंगाडे, प्रेरणा शिंगाडे, अक्षदा किरकसे, दयानंद टेळे यांची उपस्थिती होती सुत्रसंचालन व आभार धनश्री कोळपे- कोकीळ यांनी मांडले.

 
Top