उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत छत्रपती शिवराय यांच्या ३९२ व्या जन्म दिना निमित्त प्रथम श्यामराव दहिटणकर यांच्या हस्ते भवानी ज्योत प्रज्वलित करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या    प्रतिमेस वसाहतीतील महिला,बालके , मान्यगण यांच्या हस्ते मंत्रोउच्चाराने पंचाअमृतानी अभिषेक करण्यात आले त्या नंतर महिलांनी पाळण्यात शिवराय प्रतिमा ठेवून पाळणा म्हणाल्यावर चि. अर्णव दहिटणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषण केले , गझलकार बाळ पाटील ,चि. सत्यहरी शेषनाथ वाघ स्वलिखित यांनी छत्रपती शिवराय यांच्या वर कविता सादर केली त्याच बरोबर बाल किर्तनकार कु.वैष्णवी कुलकर्णी या ९ वी  वर्गात शिकणारी  शिवचरित्र विषयवार किर्तन केले या कार्यक्रमासाठी  डॉ. अमर सातपुते, कलाध्यापक शेषनाथ वाघ , यशवंत सुर्यवंशी , हभप गोकुळ घाडगे, डॉ. रुपेशकुमार जावळे ,श्री.चव्हाण , सौ . सुनिता दहिटणकर ,सौ. डुबणे, सौ. सुदर्शना वाघ उपस्थित होते . कु.सार्थकी वाघ कु .दिशा सलगर, श्रद्धा काकडे, व्यंकटेश वाकुरे ,अदित्य सलगर, अर्णव दहिटणकर यांनी जन्म सोहळा यशस्वी करण्या करिता  परिश्रम घेतले .

 
Top