उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून जाणुनबुजून कारवाई केली आहे. भाजपाचे कांही लोक महाविकास आघाडीचे सरकार एक महिने चलेल, ६ महिने चलेल, दोन महिने चलेल, अशा प्रकारचे वक्तव्य करीत होते. परंतू राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्या अडीच वर्षांपासून स्थिर सरकार आहे आणि हीच भाजपाच्या लोकांची पोटदुखी आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय आदी यंत्रणेचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. आणि हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू हे सरकार कांही अस्थिर न होता. पुढे हे सरकार अपले अनेक टर्म पुर्ण करेल, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थात महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीनही पक्षाचे नेते उपस्थित होते.शिवसेनेचे खासदार ओमराजे यांनी लोकशाही मध्ये हे सर्व लोकांच्या लक्षात येत आहे, असेही सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, काँग्रेसचे केंद्रात ७० वर्ष सरकार होते. परंतू कधी ही अशा प्रकारचे दबावाचे राजकारण काँग्रेस पक्षाने केले नाही. महाविकास आघाडीचे यश पाहून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगितले. माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे यांनी केंद्र सरकार चुकीच्या पध्दतीने हे सर्व करत आहे. त्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रतापसिंह पाटील, नवाब मलिक यांची अटकच मुळात चुकीची केली आहे. राज्य सरकार गेल्या अडीच वर्षांपासून सक्षमपणे चालत आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी हा खोडसाळपणा चालू असल्याचे सांगून प्रतापसिंह पाटील यांनी भाजपच्या असल्या राजकारणाला जनता वैतागली आहे, असा टोला मारला.या आंदोलनात राजाभाऊ शेरखाने,प्रशांत पाटील, मसुद शेख, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
Top