उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  भाजपा महिला मोर्चा उस्मानाबाद वतीने शिवजयंतीनिमित्त आदर्शवत अशी शिवप्रतिज्ञा तयार करुन त्या कार्याचा शुभारंभ हा  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर उस्मानाबाद शहरातील अभिनव इंग्लिश स्कूल,छत्रपती शिवाजी हायस्कूल,सरस्वती माध्यमिक हायस्कूल,भाई उद्धवराव पाटील शाळा,जि.प. कन्या प्रशाला,फ्लाईंग इंटरनॅशनल स्कुल,श्री व्यंकटेश मा. व उच्च मा. आश्रम शाळा,घाटंग्री इत्यादी शाळेमध्ये जावुन विद्यार्थ्यांकडुन ती प्रतिज्ञा शपथस्वरुपात वदवून घेण्यात आली.

या शपथेच्या माध्यमातून राष्ट्रनिष्ठा, पर्यावरण संतुलन,निसर्गसंवर्धन,सामाजिक ऐक्यभाव,हानिकारक असलेली व्यसनमुक्ती, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, वडीलधारी मंडळी,गुरुजन यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यात आला. प्रतिज्ञापत्राची एक प्रत फ्रेम स्वरूपात प्रत्येक शाळेला भेट म्हणूनही देण्यात आली. ही शपथ लिहिण्यासाठी आनंद वीर सर यांचे योगदान लाभले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सिंधु जाधव, जिल्हा सरचिटणीस वर्षा पाटील आणि भाजपा युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड यांचेही सहकार्य लाभले. प्रत्येक शाळेमध्ये ह्या संकल्पनेला विद्यार्थ्यांकडुन आणि शिक्षकांकडुन तसेच पालकांकडून उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन आणि प्रतिसाद  मिळाला.  भाजपा महिला मोर्चाच्या या आगळ्यावेगळ्या शिवजयंतीच्या उपक्रमाबद्दल शहरातील विविध घटकांकडून  कौतुक होत आहे.


 
Top