तेर /प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै. डॉ. चंद्रकलादेवी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या 100 मीटर धावणे  स्पर्धेतील विजेत्यांना माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै. डॉ. चंद्रकला देवी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नरहरी बडवे यांनी विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील प्रथम विजेता साहिल रसाळ, द्वितीय विजेता सुशांत फासे, तृतीय विजेता  ज्ञानेश्वर माळी यांना माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नवनाथ पांचाळ ,अजय म्हस्के उपस्थित होते.


 
Top