उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी, जवळा (खुर्द) ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात जवळा (खुर्द) व परिसरातील सर्व वयोगटातील ४९५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन मा.सचिन विश्वनाथ पवार (भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, तंटमुक्ती अध्यक्ष जवळा (खुर्द) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मा.दत्ताभाऊ साळुंखे (माजी सभापती पंचायत समिती कळंब), श्रीराम मुरलीधर पवार, पांडूरंग ढाणे, वैभव पवार, काकासाहेब घोगरे, राहुल पवार, प्रमोद घोगरे, नवनाथ पवार, गोविंद घोगरे, प्रशांत पवार, रामेश्वर पवार, श्रीकांत लोमटे, काकासाहेब लोमटे, यांच्यासह कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्या वैशाली पवार, निता बरकते, मुंकता खोत, सविता खोत, प्रियंका कापसे (सुपरवायझर), अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थीत होते. तसेच प्रा.तळशीराम उकिरडे यांनी प्रस्ताविका केली. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सौरभ शर्मा, डॉ.राजन पाटील, डॉ. दिपक बाराते, डॉ.गौतम फुलारो, डॉ.ओवेस, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ,  नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top