उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काजळा गावात विविध योजनेतंर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत. ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी सातत्याने ग्रामपंचायतीचा पुढाकार राहिलेला आहे. विकासकामाचा नवा पॅटर्न काजळा गावाने निर्माण केला असून हाच आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले. तर विविध विकासकामे करण्यासाठी कायम पाठीशी राहण्याची ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे हायमस्ट लॅम्प व श्री रामानंद महाराज मंदिर परिसरातील सभागृहाचे लोकार्पण भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१५) करण्यात आले. हायमास्टसह सभागृह कामासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला आहे. श्री सद्गगुरू रामानंद महाराज मंदिर परिसरात आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या आमदार निधीतून १५ लाखाचा निधी खर्चून सभागृह उभारण्यात आले आहे. तर २५/१५ योजनेतंर्गत १० लक्ष रूपयांचा निधी खर्चून ९ हायमस्ट लॅम्पची उभारणी करण्यात आलेली आहे. या कामाचे लोकार्पण आ. ठाकूर व आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, जिल्हा परिषद सदस्य अभिमन्यू शितोळे, पंस सभापती हेमाताई चांदणे, उपसभापती प्रदीप शिंदे, ज्येष्ठ नेते विष्णूदास आहेर, प्रमोद पाटील, मच्छद्रिं क्षीरसागर, बालाजी क्षीरागर, भाजपाचे बालाजी कोरे, नगरसेवक राहुल काकडे, ॲड. नितीन भोसले, सरपंच प्रविण पाटील, उपसरपंच जिजाबाई मडके, रामानंद महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य शुभम शिंदे, हाजगुडे ताई, अरूण शेळके, राजुळ पवार, बाबुराव देशमुख, किशोर लिंगे, काका कोळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंदू पवार, देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप शेळके, चंद्रकांत मडकेे, अप्पा पवार, प्रकाश देशपांडे, मनोज कदम, प्रमोद कदम, सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामचंद्र कदम, विशाल राऊत, अमोल मडके, सारोळाचे सरपंच प्रशांत रणदिवे, तेरणा कारखान्याचे माजी संचालक रमेश रणदिवे, तानाजी पाटील, भैय्या हजारे, अप्पा शिंदे, काका कोळी, पांडूरंग सुतार, सिध्देश्वर दुटाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर सुत्रसंचालन व आभार प्रा. विकास राऊत यांनी केले.

विकास कामांसाठी कायम पाठीशी

काजळा गावात विकासकामांसाठी आमदार निधी, जिल्हा परिषदसह २५/१५ योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येत आहेत. यापुढेही विविध विकास कामे करण्यासाठी काजळा गावाच्या पाठीशी राहणार आहे. ग्रामपंचायतीने निधीची मागणी करून मंजूर निधीतून कामेही पूर्ण केली आहेत. पत्रकार धनंजय रणदिवे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्यांचा सातत्याने पाठपुरावा असल्यामुळेच कामे होत असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 


 
Top