उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

धाराशिव निवृत्ती वेतनधारक संस्थेच्या (ता. शाखा उस्मानाबाद)   सर्व अजीव सभासदांनी संस्थेची त्रैवार्षीक आमसभा शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ०४.०० वाजता  पेन्शन भवन समता नगर उस्मानाबाद येथे संस्था अध्यक्ष श्री. बी.एन कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली अयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष भास्करराव कुलकर्णी यांनी केले आहे. 

सभेमध्ये  मागील सभेचे प्रोसिडींग वाचन व मान्यता, साल सन २०१७-१८ ते २०२१-२२ या कालवधीच्या आहवलाचे व आर्थिक जमाखर्च पत्रकाचे वाचन व मान्यता, सालसन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षाकरिता नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करणे व त्याकरीता निवडणुक अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आदी विषय असणार आहेत. तसेच ऐनवेळचे विषय अध्यक्षांचे परवानगीने घेण्यात येतील, अशी माहिती अध्यक्ष भास्करराव कुलकर्णी यांनी दिली.

 

 
Top