उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याला अनेक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खिलाडू देणाऱ्या चॅलेंर्ज क्लबला आपल्या मैदानासाठी प्रशासनाशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यासाठी १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सर्व खेळाडू हजर राहून पाठींबा देत आहेत. 

 टाकी बांधकामामुळे खराब झालेले मैदान दुरुस्त करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने याच मैदानावर खेळून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापर्यंत मजल मारलेल्या तत्कालीन ९ खेळाडू, संघटकांनी आता पुरस्कार परत करण्याचा पवित्रा घेतला उस्मानाबादचे नाव सातासमुद्रापल्याड नेण्यात येथील चॅलेंजर्स स्पोर्टस् क्लबचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे उस्मानाबादला अखिल भारतीय स्तरावरील अनेक हॉलीबाल स्पर्धा या क्लबमुळेच प्रशासनाच्या सहकाऱ्याने घेतल्या आहेत. परंतू सध्या प्रशासन अशा पध्दतीने का वागणूक देत आहे, याची चर्चा शहरात सुरू आहे. याच परिसरात आॅफिसर क्लब म्हणजे िसव्हील क्लब गेल्या अनेक वर्षांपासून याची वास्तू उभी आहे. या वास्तूचा किती अधिकारी व कर्मचारी लाभ घेतात हे न पाहिलेले बरे.

   क्रीडा महर्षी स्व. शिवाजीराव नलावडे यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला. यातून देशपातळीवर उस्मानाबादचा बोलबाला झाला. अगदी अलीकडच्या ६ वर्षांपूर्वीपर्यंत तो कायम राहिला. परंतू गेल्या कांही वर्षापासून मैदानाच्या परिसरात नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाल्यामुळे हॉलीबॉल मैदान बंद पडले होते. पाण्याच्या टाकीचे काम पुर्ण झाल्यानंतर ही या मैदानाची दुरूस्त करण्याची परवानगी चॅलेंर्ज  क्लबला दिली जात नाही, त्यामुळे सध्या हॉलीबॉलचा सराव बंद आहे. ही मोठी शोकांतीका आहे. 

 
Top