प्रधानमंत्री मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

उस्मानाबाद (प्रतिनिधी) - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार असून यांना शासनाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेकांचे अनुदान रखडले असून ती अनुदानाची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी दिले.

उस्मानाबाद येथील सांजा रोड परिसरात शिवाजीनगर भागात भाजपा  कामगार आघाडी व स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रधानमंत्री मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यातील  कामगारांना मध्यान्ह भोजन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजप कामगार आघाडी तथा स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद भालेराव, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय काशीद, उमानाबाद गुत्तेदार संघटनेचे अध्यक्ष विलास डोलारे, उपाध्यक्ष श्रावण धावरे, कामगार भवन केंद्र प्रमुख उमेश जगदाळे, मनोज देशमुख, अजित नर्सिंगे, जीवन जाधव, मुकुंद पाटील, पुष्पकांत माळाले, रवी पवार आदी उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांनी कामगारांशी हितगुज साधून त्यांच्या अडचणी विषयी चर्चा केली. तसेच मध्यान्ह योजनेचे भोजन‌ स्वतः आ. पाटील यांनी कामगारांना वाढले. तर आनंद भालेराव यांनी दररोज दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत मध्यान्ह भोजनची गाडी ही कामगारांच्या साईटवर जाऊन सर्वाना जेवण देईल व मुक्कामी कामगारांना दुपार व संध्याकाळचे भोजन देखील मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे संघटनेच्यावतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ फेब्रुवारीपासून संपूर्ण जिल्हाभरातील कामगारांचा सर्वे करून त्यांना भोजन त्यांच्या साईटवर जाऊन देण्यात येणार आहे. या सर्व योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील ४० ते ५० हजार कामगारांना भोजन  देण्यात उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.  यावेळी रवी पवार, अंगुल माने, एजाज सय्यद, नेताजी शिंदे, नंदकुमार मनाले, सर्फराज पटेल, समद सय्यद, लहू बनसोडे, संघर्ष बनसोडे, विठ्ठल पाटील, रणजित गुरव  व कामगार व गुत्तेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top