उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहास जाहीर झालेला पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार रविवारी मराठी राजभाषा दिनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कवयित्री केसकर या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अधिपरीचारिका पदावर कार्यरत असून त्यांचा कवितासंग्रह जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित झाला. मुंबई येथील ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला यापूर्वी बडोदा येथील अखिल भारतीय पातळीवरील अभिरुची साहित्य गौरव पुरस्कारासह उमरगा येथील महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, मंगळवेढा येथील शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टचा उल्लेखनीय ग्रंथ सन्मान पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाग्यश्री केसकर यांचे अभिनंदन होत आहे.


 
Top