उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील नागरी प्राथमिक  रुग्णालया वैराग रोड,उस्मानाबाद येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 2022 चा अस्मिता कांबळे जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस देऊन शुभारंभ करण्यात आला.

 या वेळी बालकांच्या आई-वडिलांना पोलिओचे महत्त्व समजावून देण्यात आले व दर वेळी पोलिओ मोहीमेला दुर्लक्ष न करता  5 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ डोस द्यावा असे आव्हान करण्यात आले.

यावेळी अस्मिता कांबळे जिल्हा परिषद अध्यक्ष उस्मानाबाद, डॉ. नितिन बोडके जिल्हा आरोग्य अधिकारी,  डॉ. कांबळे नोडल ऑफिसर महाराष्ट्र राज्य, डॉक्टर धनंजय पाटील जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद, डॉक्टर कुलदीप मिटकरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सी.के ऐवाळे, डॉ. शकील अहमद खान वैद्यकीय अधिकारी नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1, डॉ. मृणाल धावारे, डॉ. सोनाली शिंदे, बाळासाहेब काकडे, एम पी डब्ल्यू मगर,  श्रीमती शीतल गायकवाड, रत्नाकर पाटील, श्रीमती शेटे ए एन एम  तसेच PHN गायकवाड,फार्मासिस्ट सुमेध बनसोडे,सुहास चौहान, स्टाफ नर्स नीता डुकरे तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी सहकारी उपस्तीत होते,मोठ्या संख्येने लाभार्थी यावेळी हजर होते यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानून पल्स पोलिओ लसीकरण पुढे चालू ठेवण्यात आले. 


 
Top