उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   उस्मानाबाद येथील सुप्रसिध्द विधिज्ञ ॲड.राज कुलकर्णी यांची निवड अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या विचार विभाग राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड ककरण्यात आली. या निवडीबद्दल अॅड. राज कुलकर्णीं यांचा   सत्कार करण्यात आला व पुढील राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन वृद्धी साठी काम करत असलेल्या उस्मानाबाद पर्यटन विकास समिती मध्ये ॲड.राज कुलकर्णी हे  गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांचा सत्कार करताना नगरसेवक युवराज नळे, राजाभाऊ कारंडे,मोहन मुंडे, प्रा.नितीन घुले, विनोद कुलकर्णी, गणेश वाघमारे,बाबा गुळीग, सुधीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.या निवडीचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे तसेच अॅड. राज कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 


 
Top