तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथील आठवण ग्रुप च्या वतीने स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी आठवण ग्रुपचे संस्थापक दत्ताभाऊ गवळी यांनी लता मंगेशकर यांच्या तुळजापूर शहरातील आठवणी सांगून त्या आठवणींना उजाळा दिला.

    याप्रसंगी युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी लता मंगेशकर यांचा जीवनपट सांगून तुळजापुरातील सर्व स्वयंसेवी संस्था व डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर च्या वतीने श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, बालाजी कामे, संदीप इंगळे, जयंत चौधरी चंदू जटाळ, दयानंद पेंदे  दिग्विजय पाटील, आत्माराम पुजारी , तात्या इंगळे उपस्थित होते. 

 
Top