तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील अष्टभुजा महिला नागरी सहकारी पतसंस्था , नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर येथे मकर संक्रांती हळदी कुंकू कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने महिलांसाठी   बी.पी शुगर, ईसीजी पांढरे रक्त पेशी, लाल रक्त पेशी तपासणी शिबिर उपजिल्हारुग्णालयात घेण्यात येवुन  यात  187 महिलांची  आरोग्य तपासणी केली.

 यावेळी महिलांना रक्तदान करण्यासाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई सोमाजी यांनी सर्व महिलांना आवाहन केले. यावेळी संस्थेच्या सचिव संध्या खुरूद,सुनिता काळे, श्रीदेवी वेदपाठक, अपर्णा बर्दापूरकर ,लता सोमाजी, रसिका लसणे, सुलभा कदम, सुवर्णा उमाप, निकिता राऊत, अनिता चव्हाण, मंदाकिनी नाईकवाडी, लता हरवाळकर  ,अक्षता राऊत, शितल हंगरगेकर इत्यादी महीला पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात महिलांनी मोठा सहभाग नोंदवला


 
Top