उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी ५०% हिस्स्याने पूर्ण करण्याचे ठरले होते. मागील दोन वर्षात केंद्र सरकारने या रेल्वे मार्गासाठी रु. ३२ कोटीची तरतूद केली परंतु  रेल्वे बोर्डाने अनेकदा मागणी करून आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून देखील ठाकरे सरकारने या रेल्वे मार्गासाठी आजवर एका रुपयाचीही तरतूद केली नाही. हे सर्व माहीत असुन स्वतः काहीही प्रयत्न न करणाऱ्या खासदारांचे  कालचे वक्तव्य म्हणजे तंतोतंत ‘ चोराच्या उलट्या ’. असे आहे, असा शाब्दीक हमला भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांनी खासदारांवर चढवला आहे. 

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी या रेल्वेमार्गाची घोषणा केली, मंजुरी दिली, भूमिपूजनही केले, आजवर रू. ३२ कोटी निधीची तरतूद करून कामही सुरू केले. सदरील रेल्वेमार्गाचा ५० : ५० टक्के खर्च राज्य सरकारने व केंद्र सरकारने उचलायचे ठरले होते. केंद्र सरकार यासाठी दरवर्षी तरतूद करत आहे, ठाकरे सरकारकडून मात्र जाणीवपूर्वक काहीच प्रतिसाद दिला जात नाही. राज्यातील इतर रेल्वे मार्गांना राज्य सरकार कडून भरघोस निधी दिला जातो, परंतु उस्मानाबाद जिल्ह्याला मात्र राज्याचे परिवहन मंत्री धादांत खोट बोलत सपशेल सापत्न वागणूक देत आहेत.  आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह परिवहन मंत्री महोदय यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील अधिवेशनात देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला होता तसेच या बाबत खोटी माहिती दिल्याबद्दल परिवहन मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल केला होता, परंतु विकासाशी काहीच देणे घेणे नसलेल्या वसुली सरकारला यात स्वारस्य नाही. खासदारांनी केंद्रावर व भाजपावर आरोप करण्यापेक्षा आधी ठाकरे सरकारच्या हिस्याचे रू. ३२ कोटी आणावेत व मग निधी देण्यात केन्द्र सरकार कमी पडलं तर सांगाव असं प्रति आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांनी खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना दिले आहे.


 
Top