उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील उंबरे कोठा येथील सबइन्स्पेक्टर अशोक भुजंगराव उंबरे हे पॅरामिलीटरी अर्थात सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) येथे तब्बल 39 वर्षे सेवा करून 31 जानेवारी रोजी राजस्थान येथील पोखरण युनिट हेडक्वॉर्टर येथून सेवानिवृत्त झाले आहेत. ते गावी रेल्वेने उस्मानाबाद स्थानकावर आले असता त्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे अशोक उंबरे यांच्यासह तीन सख्खे भाऊ सैन्यात होते. आता ते तिघेही सेवानिवृत्त झाले आहेत.

शहरातील उंबरे कोठा येथील कै. भुजंगराव भैरू उंबरे यांची चारपैकी तीन मुले सैन्यात होती. थोरले विलास उंबरे हे आर्मीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. मधवे अशोक हे 18 मे 1983 मध्ये भरती झाले होते. अशोक व धाकटे पोपट उंबरे हे सीमा सुरक्षा बल मध्ये कार्यरत होते. पोपट हे पाच वर्षापुर्वी निवृत्त झाले असून अशोक हे 31 जानेवारी रोजी राजस्थान येथील पोखरण युनिट हेडक्वॉर्टर येथून तब्बल 39 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यांचा पोखरण येथे इन्सपेक्टर आर.सी.चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व उंटाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. ते गावी रेल्वेने उस्मानाबाद स्थानकावर आले असता कुटुंबिय रेल्वे पोलीस, व नातेवाईकांच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करीत पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद रेल्वे स्टेशन मास्तर राजेशकुमार, पत्रकार सुभाष कदम, जयचंद कदम, अमर माने, अक्षय उंबरे, आदित्य उंबरे, संकेत कोळगे, आकाश पेठे आदीसह नातेवाईक उपस्थित होते. 

 
Top