वाशी / प्रतिनिधी-  

तालुक्यातील लाखनगाव येथे छत्रपती चषक लाखणगाव प्रीमियर लीग 2022 या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भैरवनाथ शुगर मिल्स चे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

या लाखनगाव प्रीमियर लीग साठी भूम-परंडा-वाशी चे  आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत  यांच्याकडून एक लाख रुपये प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे,द्वितीय पारितोषिक संजय दादा कलाटे उद्योग पिंपरी चिंचवड यांच्याकडून 51 हजार रुपये देण्यात येत आहे,तृतीय पारितोषिक 31 हजार रुपये रामेश्वर वसंत कोळी उद्योग नवी मुंबई तसेच चतुर्थ पारितोषिक विकास भगवान तळेकर शिवसेना उपतालुका प्रमुख वाशी यांच्याकडून देण्यात येत आहे.या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी भैरवनाथ शुगर मिल्स चे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्यासोबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी,बंडू खोसे,दिनकर शिंदे, नितीन रणदिवे,अतुल चौधरी, अशोक लाखे,लाखनगावचे उपसरपंच लक्ष्मण लाखे, ग्रामपंचायत सदस्य राजा कोळी आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या स्पर्धेतील विजेत्या चे बक्षीस वितरण शिवसेनेचे उपनेते माजी जलसंधारण मंत्री तथा भूम परांडा वाशी चे विकासरत्न आमदार प्राध्यापक डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन करण्यात येणार आहे.


 
Top