उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्याबाबतची माहिती जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करुन कळवावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 सद्यस्थितीत रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनविरुध्द युध्द घोषित केले आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक युक्रेनमध्ये अडकले आहेत अशा नागरिकांनी त्याबाबतची माहिती तात्काळ जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करुन कळवावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास आपत्ती व्यवस्थापन कक्ष क्रमांक (02472) 225618, 227301 या क्रमांकावर संपर्क करुन कळवावी. जेणेकरुन अडकलेल्या नागरिकांना सुखरुपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल.

  तसेच याबाबत नवी दिल्ली येथील केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयात नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेथील हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री), +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905 आहेत आणि फॅक्स नंबर +91-11-23088124 हा आहे तसेच तेथील ई-मेल आयडी situationroom@mea.gov.in हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी नागरिक युक्रेनमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी  नमूद क्रमांकावर संपर्क करवा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री .दिवेगावकर यांनी  केले आहे.

 
Top