तुळजापूर / प्रतिनिधी-

  पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार व आ.सुनिल शेळके यांनी महाराष्ट्रात पुनश्च बैलगाड्या चालु होवु दे यासाठी देविला नवस बोलला होता तो पुर्ण होताच महाराष्ट्र राज्याचे  पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार तसेच  आमदार सुनील  शेळके  यांनी गुरुवार दि.२४ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन बैलगाडा शर्यत चालु झाल्याबद्दल  श्रीतुळजाभवानी मातेस साडीचोळी अभिषेक पुजा करुन नवसपुर्ती केली.

 छञपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन बैलगाडीत बसुन मंत्री  सुनीलजी केदार व  आमदार  सुनील  शेळके हे श्री तुळजाभवानीचे मंदीरात आले मंदीरात जावुन देविस खणनारळ ओटी भरुन साडीचोळी अभिषेक पुजा करुन देविस नवसपुर्ती केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top