तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नोंदणीकृत कामगारासाठी मध्यान भोजनाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस प्रवीण साळुंके यांच्या प्रयत्नाने ही योजना तेर येथे सुरू करण्यात आली आहे. यावेळी कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख उमेश जगदाळे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे ,दत्तात्रय मगर ,अनिल ठोंबरे,अर्शाद मुलांनी व कामगार उपस्थित होते.


 
Top