तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेस  पोर्णिमा दिनी  शेतकऱ्यांनी शेतात आलेले प्रथम धान्य  देविस अर्पण करुन  देविचरणी प्रार्थना केली.  आज माघी पोर्णिमा पार्श्वभूमीवर शेतकरी भाविकासह इतर भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती आज श्रीतुळजाभवानी मंदीरात गृभगृहासह परिसरात भाविकाने आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती.

  माघी (नव्याचा)पोर्णिमा दिनी  शेतकऱ्यांनी सकाळी शेतातील  कणसे असलेले ज्वारी,गहु, हरभरा, करडीचे धाटे  आणुन देविला अर्पण केले नंतर काही धाटे श्रीतुळजाभवानी मंदीरातील मुख्यगर्भगृहातील चोपदार दरवाजा होमकुंड व निंबाळकर दरवाजाला लावून देविचरणी होमासमोर दंडवत घालुन प्रार्थना केली नंतर स्वताचा दारात प्रथम ज्वारी धाटे गव्हाचा लोंबा  हरभरा करडी याचे धाटे लावले.   अनादि कालापासून शेतातील आलेला शेतमाल प्रथम देवीचरणी देवीदारी अर्पण करुन मगच शेतमाल काडण्यास आरंभ करतात आज पासुन हुरडा पार्ट्या आरंभ होतात व शेतमाल  खाण्यास व विकण्यास प्रारंभ  करतो राञी श्रीतुळजाभवानी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर माघी नव्याचा पोर्णिमेचा धार्मिक विधीचा सांगता झाली.


 
Top