तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील रामतीर्थ ग्रामपंचायत अंतर्गत राम नगर येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. वसंतराव नाईक तांडा सुधार ,योजने अंतर्गत सिमेंट रस्ता जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून.त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, रामतीर्थ येथील सरपंच बालाजी राठोड, उपसरपंच सुनील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण राठोड, माजी उपसरपंच रामु चव्हाण, धनाजी राठोड पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गुरूदेव राठोड, बाबुराव राठोड, तुकाराम चव्हाण, सुनील राठोड,व्यकट‌ राठोड, , सुनील माने, सिताराम चव्हाण यांच्या सह महिला उपस्थित होते.

 
Top