उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेसने एक दिवस राष्ट्रवादीसाठी.. एक नवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. तो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबविण्यात यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्ह्यात प्रथम या उपक्रमास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी या दुसर्‍या महिन्यातील पहिल्या शनिवारी (दि.5) दुधगाव या त्यांच्या गावी नागरिकांशी विविध प्रश्नावर संवाद साधला.

यावेळी दुधगावकर यांनी गावातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये दुधगाव शिवारातील तेरणा नदीकाठच्या शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने वाहून जावून जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन मातीकाम करुन घेण्याचे सर्वानुमते ठरले. याशिवाय अनेक विषयावरही चर्चा करण्यात आली आहे. यावेळी गावचे सरपंच शामसुंदर त्र्यंबकराव पाटील, अफजल पठाण, पापामियाँ सय्यद, बब्रुवान कसबे, विक्रम धाबेकर, शेख रहिम शेख, शेख नुर शेख, संभाजी धाबेकर, अक्षय धाबेकर, छोटू धाबेकर आदींसह शेतकरी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. दुधगावकर यांनी पहिल्याच महिन्याच्या पहिल्या शनिवारी गावात  राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य फार्म भरुन घेवून सुरवात करुन गावकर्‍यांशी संवाद साधला होता. त्यानंतर दुसर्‍या महिन्यातील पहिल्या शनिवारी पक्षाने केलेल्या संकल्पाप्रमाणे वाटचाल सुरु ठेवली आहे. त्यास नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे.


 
Top