तुळजापूर  / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी मंदीर समितीने दानपेट्यंचा रचनेत  बदल करुन दानपेट्यांनवर पादुका बसवल्याने भाविकांना आता कुलधर्मकुलाचार करणे , देविसमोर नतमस्तक होणे आता शक्य होणार असल्याने भाविकांन पुजारी वृंदात समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

नवीन दानपेट्या ४ फेब्रुवारी २०२२रोजी  त्या गाभाऱ्यात मांडल्या होत्या माञ या नवीन दानपेट्यांनमुळे भाविकांना कुलधर्मकुलाचार करता येत नव्हता या बाबतीत श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाअधिकारी यांना निवेदन देवुन नवीन पेट्यांचा रचनेत बदल करण्याची मागणी केली होती 

नव्या बसलेल्या पेट्यांनवर वरील बाजुस छोटे हत्ती बसवले होते. यामुळे देविंजींना साडी चोळी खणनारळ ओटी  अर्पण करता येने शक्य नव्हते तसेच देविसमोर नतमस्तक होणे शक्य  होत नव्हते माञ वरील बाजूचे छोटे हत्ती  काढाकल्याने भाविकांना व पुजारी वृंदांना पुजा अर्चा करणे शक्य होणार आहे.नतमस्तक होता येणार आहे.

 

 
Top