उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील गवळी गल्लीतील धाराशिवचा महाराजा, मानाचा गणपती गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गौरवास्पद कामगिरी करणारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू राजवर्धन हंगरगेकर, जलतरणपटू श्रावणी व शिवराज रणखांब या बहिण-भावाचा,कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रचार करणारे प्रा. श्यामराव दहिटणकर यांचे या वेळी सत्कार करण्यात आले. प्रा. गजानन गवळी, डाॅ. अजित नायगावकर,राजकुमार दिवटे, संजय पाळणे, नंदकुमार हुच्चे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माउली व ज्ञानदीप महिला भजनी मंडळाने विविध भक्तिगीत, गवळणी सादर केल्या.

या वेळी अथर्वशीर्ष पठणही करण्यात आले. शुभम जानगवळी, अप्पा खरवरे, पवन मलकूनाईक, पंकज जानगवळी यांनी सपत्नीक पूजन केले. गणपती बाप्पा मोरया-कोरोनाला हरवू या अशा जयघोषात परिसर निनादून गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वास दळवी,संकेत व छोटू तीर्थकर, सागर पाळणे, बेद्रे, दुर्गेश दिवटे, मनोज व वैभव अंजीखाने, राहुल गवळी यांनी तसेच भाविक महिलानी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भालचंद्र हुच्चे, आभार डाॅ. नायगावकर यानी मानले.

दरम्यान गणेश जयंतीचा उत्सव शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी पारंपरिक उत्साहाने साजरा झाला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक भाविकांची उपस्थिती होती.


 
Top