उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एल एन टी फायनान्स सर्विसेस, अफार्म पुणे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था उस्मानाबाद यांच्या वतीने सुरू असलेल्या डिजिटल सखी प्रकल्पाअंतर्गत  उस्मानाबाद क्लस्टर मधील वाघोली, महाळंगी, चिखली,  कामेगाव, बोरखेडा आणि रूईभर तसेच जुन्या कार्यक्षेत्रातील डिजिटल सखी उद्योजिका, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांची आढावा बैठक एल अँड टी फायनान्स सर्विसेसचे   किरण कदम, डिजिटल सखी प्रकल्पाच्या अफार्मच्या प्रकल्प व्यवस्थापक  रश्मी दिक्षित, साहित्यरत्न संस्थेचे पांडुरंग घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत  स्टेक होल्डर कार्यक्रम उस्मानाबाद येेथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.


स्टेक होल्डर कार्यक्रमात काम करत असलेल्या डिजिटल सखी व उद्योजिका यांनी आपले अनुभव कथन केले तसेच या कार्यक्रमामुळे त्यांच्यात झालेले बदल आणि मिळालेले यश याबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून  वाघोली गावचे माजी सरपंच सतीश बापू खडके, कामेगावचे सरपंच नानासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.कार्यक्रमात प्रमुख अतिथीसह, पत्रकार उपेंद्र कटके, एल अँड टी फायनान्स चे किरण कदम, रश्मी दिक्षित,दिशा समाज विकास संस्थेचे संस्थापक बाबासाहेब वडव यांनी मार्गदर्शन केले व महिलांना स्वत:च्या पायावर उभा करण्यात पांडुरंग घोडके यंाचा मोलाचा वाटा असल्याचे ही सांगितले. 

 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल सखी सरस्वती कदम व लक्ष्मी पाटील यांनी केले. हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लस्टर मॅनेजर संजीव आगळे तसेच डिजिटल सखी आणि संस्थेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 
Top