तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत पणे पुजारी व्यवसाय करणाऱ्या तिघांना रविवार दि13रोजी ताब्यात घेवुन  पुढील कारवाई साठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या बाबतीत अधिक माहीती अशी की , श्रीदेविजींचे थेट दर्शन देतो,असे सांगून पैसे घेऊन मुख दर्शन रांगेत सोडून जाणेसह अनेक तक्रारी  भाविकांकडून मेलद्वारे तसेच व्हाट्सअप द्वारे मंदीर  प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने व  अनाधिकृतपणे पुजारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला आळा घालण्यासाठी किंवा त्यांची ओळख पटवण्यासाठी पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांना सोबत घेऊन रविवार  13 रोजी स्वतंत्र पथक निर्माण करून मंदिर व मंदिर परिसरात तसेच दर्शन मंडप येथे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, मंदिर कर्मचारी व मंदिर सुरक्षा व स्वच्छता सुपरवायझर, सुरक्षारक्षक सोबत घेऊन पाहणी करण्यात आली.

यावेळी उत्तम शेळके, प्रेमनाथ पुजारी ,  गणेश सांळुके  हे  तीघे  अनाधिकृतपणे पुजारी व्यवसाय करताना निदर्शनास आले त्यांना ताब्यात घेऊन मंदिर पोलिस चौकी, तुळजापूर येथे पोलीसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले .


 
Top