उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील काजळा येथील श्री रामानंद महाराज  विद्यालयातील  इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. तसेच  विद्यालयाच्या नवीन प्रवेशद्वाराचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विनोद बाकले तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रवीण क्षीरसागर-पाटील, उपसरपंच जिजाबाई मडके, तुळजाभवानी वरष्ठि महावद्यिालयाचे प्रा. सोहन कांबळे, शालेय शक्षिण समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र कदम, प्राचार्य आर. बी. येलगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात वद्यिार्थ्यांसह प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली. प्रा. सोहम कांबळे यांनी प्रसध्दि मराठी अभिनेते निळू फुले, दादा कोंडके यांच्यासह हिंदी सिनेमासृष्टीतील अभिनेते अमिताभ बच्चन, संजय दत्त, शाहरूख खान यांच्यासह विविध अभिनेत्यांचे हुबेहुब आवाज काढून उपस्थितांचे लक्ष वेधले. वद्यिार्थ्यांनी स्वत:ला ‘ढ’ न समजता आत्मवश्विासाने सामोरे जावे. आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे, असे आवाहनही प्रा. कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मालोजी पवार, श्रीमती प्रा. डॉ. वैशाली बोबडे, एन. एम. वाकडे, डी. जे. खारगे, आर. डी. पवार, पी. जे. पवार, व्ही. ए. पाटील, एस. डी. राठोड, खैरुद्दीन सय्यद, रमाकांत वाघमारे यांच्यासह वद्यिार्थ्यांनी परश्रिम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकिता क्षीरसागर, प्रास्ताविक प्राचार्य आर. बी. येलगोंडे, मनोगत प्रा. जगदीश करंडे, प्रीती पाटील, अभिजित काळे तर आभार भागवत ठोंबरे यांनी मानले. 


 
Top