तुळजापूर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ने दणदणीत विजय संपादन केला असुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरपदासाठी सलग तीन वेळा निवडुन आलेल्या सुनिल चव्हाण यांना बँकेचे चेअरमन देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यां मधुन केली जात आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी कुणाची वर्णी लावणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत  भाजपाचे वर्चस्व  असणाऱ्या तुळजापूर तालुक्यातुन माजी आ. मधुकर चव्हान यांचे पुञ दोन वेळी विक्रमी मताने व आता तिसऱ्यांदा बिनविरोध निवडुन येवुन आपले राजकिय ताकद दाखवून दिली आहे.सुनिल चव्हाण संचालक पदासाठी बिनविरोध येणे हे महाविकासआघाडीच्या विजयात महत्त्वाची भूमिका ठरली आहे.यामुळे बँकेचा निवडणुकीला कलाटणी मिळाल्याचे बोलले जाते. 


 
Top