उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आ. सुजितसिंह ठाकूर   यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो यासाठी आई तुळजाभवानी चरणी साकडे घालण्यासाठी भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद शहराच्या वतीने शहराध्यक्ष राहुल काकडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद ते तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर पर्यंत च्या पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष नितीन काळे  , माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आमदार ठाकूर  यांचा जयघोष करत, अतिषबाजीच्या साथीने पदयात्रेला सुरुवात केली. तुळजापूर येथे पहाटे 3 वाजता दाखल होऊन आई तुळजभवानी महाद्वार येथे महाआरती व प्रार्थना केली.  यावेळी मालोजी सूर्यवंशी, सदानंद अकोस्कर, अमोल पेठे, सुजित साळुंखे, संदीप इंगळे, किरण काकडे, मिमोह अडसूळ, कृष्णा कुंभार, तानाजी गोरे, धीरज पतंगे, प्रकाश शिंदे व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top